जागावाटपाबाबत आघाडीची दिल्ली दरबारी बैठक सुरू

September 20, 2014 12:49 PM0 commentsViews: 878

5656sonia_cm20 सप्टेंबर : आघाडीत जागावाटपाचा घोळ अजूनही सुरूच आहे. तर दुसरीकडे आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होतेय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर निवासस्थानी या बैठकीला सुरूवात झाली आहे.

या बैठकीत सोनिया गांधी, मधुसुदन मिस्त्री, मखनलाल पोतदार, ऑस्कर फर्नांडीस,मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, अहमद पटेल, अंबिका सोनी, मोहसिना किडवाई, विरप्पा मोईली, जर्नादन द्विवेदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. उमेदवार ठरवणारी ही समिती आहे.

114 जागांवर उमेदवारी निश्चिती तर झालेली आहेच. पण आघाडी झाली नाही तर उरलेल्या 174 म्हणजे सर्व जागांवरचे उमेदवार निश्चित करण्यासाठीही तयारी करण्याचं राज्यातले नेते निवडणूक समितीला सांगणार आहेत.त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close