आशियाई क्रीडा स्पर्धेत जीतू रायचा ‘सुवर्ण’वेध

September 20, 2014 12:00 PM0 commentsViews: 263

jitu20 सप्टेंबर : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावतं गोल्डन सुरूवात केलीये.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालंय. जीतू रायनं 50 मी. एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलंय.

द.कोरियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात दोन पदक मिळाली आहेत. ही दोन्ही पदकं शूटिंगमध्ये मिळाली आहेत. श्वेता चौधरीनं 10 मीटर पिस्टल शुटिंगमध्ये कास्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close