शिवसेनेकडून कोणताही नवा प्रस्ताव मिळाला नाही -माथूर

September 20, 2014 1:44 PM0 commentsViews: 2116

om prakash mathur20 सप्टेंबर : युती तुटणार की टिकणार यावरुन सस्पेन्स दूर झाला असला तरी जागावाटपाचं घोडं अजूनही अडलेलं आहे.  शिवसेनेनं आपल्याला कुठलाही प्रस्ताव दिला नाही असा दावा भाजपचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर यांनी केलाय.

उद्या रविवारी दिल्लीला आमच्या नेत्यांना आम्ही यादी सोपवणार आहोत आणि महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील जी एकूण घडामोड आहे त्याची दिल्लीतल्या संसदीय मंडळाला माहिती देऊ असंही माथूर म्हणाले. पण महायुतीची घोषणा मुंबईतच होईल असंही त्यांनी सांगितलं.भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.

अखेर हो नाही हो म्हणत गेल्या तीन दिवसांपासून खोळंबलेल्या चर्चेला कालपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना प्रस्ताव पे प्रस्ताव पेश करत आहे. आधी भाजपने 135-135 जागांचा प्रस्ताव पाठवला तर सेनेनं तो फेटाळून लावला आणि 150 + प्रस्ताव सेनेनं भाजपला दिलाय.

भाजपनं दिलेल्या प्रस्तावावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेत्यांनी भाजप नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यावर आज भाजप नेते चर्चा कऱणार आहेत. आज दुपारी तीन वाजता भाजपच्या कोअर कमिटीची पुन्हा बैठक होणार आहे. माथूर यांनी जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी तोडगा निघणार असे संकेत दिले आहे. शुक्रवारी रात्री ‘मातोश्री’वर सेना नेत्यांची बैठक झाली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मात्र भाजपला प्रस्ताव पाठवला असल्याचं सांगितलं.

शिवसेनेच्या मिशन 150 मुळे हे घोडं अडलंय का यावर चर्चा सुरू आहे. अशातच आदित्य ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरतीये. महाराष्ट्रासाठी चांगलं तेच होईल. पण आम्ही 150 वर ठाम आहोत, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मिशन 150 चा पुनरूच्चार केला. पहिल्यांदाच आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात अशा प्रकारे मोठी भूमिका बजावताना दिसत आहेत. भाजपनं किंवा मित्र पक्षांनी दिलेल्या प्रस्तावावरून तोडगा काढण्याऐवजी शिवसेना आपल्या मिशन 150 वर अडून बसलेली दिसतेय. शिवसेनेच्या मिशन 150 च्या आग्रहामुळे महायुतीचं जागावाटपाचं घोडं अडलंय, असं बोललं जातंय. यामुळेच काही प्रश्न उपस्थित होतायत.

मिशन 150 हा महायुतीतला अडसर ठरतंय का ?
 जागावाटपाच्या तिढ्यावर आदित्य ठाकरे उपाय शोधण्यात यशस्वी होणार का ?
शिवसेना जागावाटपाच्या मुद्द्‌यावर माघार घेणार का ?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close