अखेर अशोक चव्हाण यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

September 20, 2014 11:01 PM0 commentsViews: 1741

ameeta chavan20 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीवरुन अखेर पडदा उठलाय. खुद्ध अमिता चव्हाण यांनीच आपली उमेदवारीची घोषणा केली आहेत. भोकर मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्यात अमिता चव्हाण यांनी स्वत:च्या उमेदवारीची घोषणा केलीये.

नांदेडमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून एक लाख मताधिक्यानं निवडून आले होते.

आता चव्हाण लोकसभेवर गेल्याने भोकरमधून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती.अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी नांदेडमधील काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केली होती.

विशेष म्हणजे मुंबई येथे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखातीदरम्यान भोकर विधानसभेसाठी एकही अर्ज आला नाही, किंवा एकानेही उमेदवारी मागितली नाहीये.भोकर या मतदार संघाबाबत अशोक चव्हाण जे ठरवतील तोच उमेदवार राहील अशी कार्यकर्त्यांची भूमिका असून आज अमिता चव्हाण यांनी स्वत:च्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही पण अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close