मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ४ प्रवासी ठार

September 21, 2014 11:49 AM0 commentsViews: 3181

Chiplun Bus Accident

21 सप्टेंबर :  मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळी आसुर्डे इथेआज (रविवारी) पहाटे खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. यांच्यातल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

साईपूजा ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून सिंधुदुर्गाकडे जात असताना अचानक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि बस रस्त्याशेजारी जाऊन उलटली. या दुर्घटनेत 4 प्रवासी जागीच ठार झाले तर जखमींवर डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close