‘आप’चे नेते मयांक गांधी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल

September 21, 2014 12:57 PM0 commentsViews: 577

mayank Gandhi

21 सप्टेंबर :  ‘आप’चे नेते मयांक गांधी यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात एका 21 वर्षांच्या तरुणीने विनयभंग आणि धमकीची तक्रार केली आहे. मुंबईतल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाच्या तरूण सिंग नावाच्या कार्यकर्त्याने असभ्य वर्तन केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल करू नये अशी गांधींकडून धमकी देण्यात आल्याचे तिने म्हटलं आहे. त्यामुळे विनयभंग करणार्‍या कार्यकर्त्यांसोबत मयांक गांधी यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गांधी यांनी आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं सांगत हे आरोप राजकीय कट असल्याचं म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close