राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागांचाच प्रस्ताव – नारायण राणे

September 21, 2014 5:39 PM0 commentsViews: 1440

narayan Rane

21 सप्टेंबर :  काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पदांसाठी नव्हे तर जागांसाठी लढा सुरु असल्याचं सांगत काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागा देण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे राज्यातील प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तर राष्ट्रवादीने 144 पेक्षा एकही जागा कमी घेणार नसल्याचे सांगत स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. तसंच काँग्रेस दोन दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याचंही नारायण राणेंनी सांगितलं.

एकीकडे युतीत जागावाटपावरून खेचाखेची सुरू आहे तर आघाडीतही तिच परिस्थिती आहे. जागावाटपावरून आता राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने 124 जागांचा प्रस्ताव धुडकावून लावत काँग्रेसला 144 जागांवर विचार करण्याचा एक दिवसाचा वेळ दिला आहे. औरंगाबादमध्ये रविवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनीही पुन्हा एकदा 124 जागा देण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी यावेळेस पुन्हा एकदा महायुतीवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकानंतर मोदी लाट निघून गेली असून आता काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वासही नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासनं 100 दिवसांत पूर्ण केली नसल्याचा राणेंनी आरोप केला. मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार नसतानाही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेना – भाजपचा हा स्वार्थीहेतू प्रचारादरम्यान जनतेसमोर मांडू असे नारायण राणेंनी सांगितले. निलेश राणे निवडणूक लढवणार नाही. मात्र राणे कुठला हिशोब बाकी ठेवत नाहीत असे सूचक विधानही राणेंनी यावेळी केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close