मंगळयानाच्या मुख्य इंजिनाची आज पूर्वपरीक्षा

September 22, 2014 9:47 AM0 commentsViews: 718

mangal yan

22 सप्टेंबर :   भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाचं आज भवितव्य ठरणार आहे. मंगळयानाच्या चौथ्या कक्षाबदलासाठी ‘इस्रो’ सज्ज झालं आहे. आज मंगळयानाच्या मुख्य इंजिनाची पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. मंगळयान दोन दिवसांत मंगळाच्या गुरुत्वीय प्रभाव क्षेत्रात प्रवेश करणार आहे. आज या मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. मंगळापासून 5.8 लाख किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षण क्षेत्र सुरू होतं. येत्या 24 सप्टेंबरला हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

440 न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या 300 दिवसांपासून बंद होतं. त्यामुळे इंजिन व्यवस्थित सुरू होण्यावर मंगळयानाचं यश अवलंबून आहे. त्याची किमान 4 सेकंदांसाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी ठरली, तर मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या यशस्वीतेबाबतचा इस्रोचा आत्मविश्वास आणखीन वाढेल. त्यासोबतच मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचणार्‍या देशांमध्ये भारत पहिला आशियाई देश ठरेलं.

मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने पाठवलेल्या ‘मावेन’ हे यान तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर आज मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश करणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close