एशियन गेम्स 2014 : भारताने पटकावले 1 गोल्ड आणि 4 ब्राँझ

September 22, 2014 11:38 AM0 commentsViews: 604

rahi

22 सप्टेंबर :  एशियन गेम्समध्ये तिसर्‍या दिवशी आपली चांगली कामगिरी कायम राखत भारताने आज पाच मेडल्स पटकावले आहे. यातएक गोल्डन आणि चार ब्राँझ मेडल्सचा समावेश आहे.

दक्षिण कोरियातील इन्चॉन इथे सुरू असलेल्या 17 व्या एशियन गेम्समध्ये राही सरनोबत आणि अनिसा सय्यद या मराठी मुलींसह हीना सिंधू यांनी आज (सोमवारी) महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. तर महिलांच्या 25 मीटर पिस्टल फायनलमध्ये राही सरनोबतने धडक मारली आहे.

याव्यतिरिक्त टेनिसमध्ये भारतीय महिला आणि पुरूष टीम कजाकीस्तानसोबत क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. स्क्वॉशच्या सिंगल्स सेमीफायनलमध्ये सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल यांचं आव्हान आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close