शिवसेना-भाजपमधल्या वादामुळे घटकपक्ष नाराज

September 22, 2014 12:52 PM0 commentsViews: 2612

mahayuti news

22 सप्टेंबर :    भाजप आणि शिवसेनेतला जागवाटपाचा तिढा कायम असल्याने महायुतीतले घटकपक्षांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे.

शिवसेना – भाजपच्या वादामुळे महायुतीतला जागावाटप खोळंबले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दुपारी दोन वाजता घटक पक्षांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यावर विचारमंथन होईल. आज संध्याकाळपर्यंत युतीतील तिढा न सुटल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले मतदार संघ जाहीर करेल असे सूत्रांकडून समजते. आम्ही शिवसेना – भाजपमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. आता युतीने आज संध्याकाळपर्यंत त्यांचा निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. चार घटकपक्ष एकत्र राहिले तर भाजप किंवा शिवसेना यापैकी एकापक्षासोबत आघाडी करण्याचा पर्यायही आमच्याकडे आहे असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. दोन्ही मोठे पक्ष स्वबळावरच जाणार असतील तर आमची 60-70 जागांवर उमेदवार देण्याची तयारी आहे असेही त्यांनी सांगितलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपच्या वादात महायुतीतील मित्रपक्षांची चांगलीच गोची झाली आहे. या मित्रपक्षांसमोर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत.

  •  घटकपक्ष सेनेबरोबर जाणार की भाजपबरोबर?
  •  शिवसेनेनं दिलेल्या 18 जागांवर मित्रपक्षांचं समाधान झालंय का?
  •  महायुती तुटली तर राजू शेट्टी आणि रामदास आठवले वेगळा विचार करतील का?

दरम्यान, युती व्हावी असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असलं तरी महायुतीचा तिढा संपायचं नाव घेत नाही. काल रात्री भाजप संसदीय समितीची झालेली बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. तर भाजपची 130 नावांची यादी तयार आहे, अशी सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपचे नेते आज मंंबईत आलेत. आज संध्याकाळी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. काल शिवसेनेने दिलेला 151-119चा अंतिम फॉर्म्युला भाजपनं फेटाळला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close