विद्युतदाहिनींचा बिघाड लाकूड माफियांच्या पथ्यावर

September 22, 2014 1:46 PM0 commentsViews: 900

उदय जाधव, मुंबई.

22 सप्टेंबर : मुंबईतल्या स्मशानभूमीत अंत्यविधीचा प्रश्नंही गंभीर बनत चाललाय. लोकांचा प्रतिसाद असुनही विद्युतदाहिनींची संख्या कमी आहे. ज्या उपलब्ध आहेत त्यापैकी अर्ध्या नादुरूस्त आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा लाकूड माफिया, लाकडांच्या विक्रीसाठी करून घेताना दिसत आहेत. या लाकूड माफियांच्या फायद्यासाठी, दरवर्षी महापालिका करोडो रुपये या स्मशानातील लाकाडांच्या खरेदीसाठी खर्च करतं आहेत.

सव्वा कोटी लोकसंखेच्या मुंबईत बीएमसीच्या 66 स्मशानभूमी आहेत. त्यापैकी 11 विद्युतदाहिनी आहेत. त्यातील चार नादुरूस्त आहेत तर एक धोकादायक इमारतीत असल्याने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सहा विद्युतदाहिनींवर अधिकचा ताण आहे.

मुंबईतलं स्मशान वास्तव : 2013-2014

  • वर्षभरात 80 हजार जणांचा मृत्यू
  • 10 हजार 642 मृतदेहांसाठी विद्युतदाहिन्यांचा वापर
  • बीएमसीकडून 13 लाख 6 हजार 300 किलो लाकडाचा वापर
  • 6 कोटी 63 लाख रुपये खर्च

विद्युतवाहिनींऐवजी पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कार केल्यानं लाकूड विक्रेत्यांचा मोठा फायदा आहे. त्यामुळेच विद्युतदाहिनींची संख्या वाढवली जात नाही, असा आरोप होतं आहे.

मुंबईत जन्माला आलेल्या बाळाचा जन्मदाखला काढण्यापासून, ते अंत्यविधीपर्यंत संघर्ष किंवा भ्रष्टाचार होताना दिसत आहे. जीवनाचा शेवट तरी नीट व्हावा, एवढीच माफक अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close