डोंबिवलीकरांनी उठवला प्रदूषणाच्या विरोधात आवाज

September 22, 2014 4:05 PM0 commentsViews: 193

polution

22 सप्टेंबर :  डोंबिवलीतल्या नागरिकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. आता जो पक्ष आणि उमेदवार प्रदूषणमुक्तीचं आश्वासन आणि अजेंडा मांडेल, त्याच उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय डोंबिवलीकरांनी घेतला आहे. तसंच प्रदूषणमुक्तीचं आश्वासन मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशाराही संतप्त नागरीकांनी दिला आहे.

गेले अनेक वर्ष एमआयडीसी आणि त्याच्या आजू-बाजूच्या परिसरात प्रदूषणामुळे डोंबिवलीकर त्रासलेले आहेत. आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी याप्रदुषणाच्या विरोधात आवाज उठवला. मात्र आज प्रथमच सर्वसामान्य डोंबिवलीकर ‘प्रदूषणमुक्त डोंबिवली’साठी रस्त्यावर उतरला होते. जो पक्ष आणि उमेदवार आम्हाला प्रदूषण मुक्त डोंबिवलीचे ठोस आश्वासन आणि त्यासाठी भविष्यात कोणती उपाययोजना करेल, त्याचा अराखडा जाहीर करेल, त्याच उमेदवाराला आम्ही आगामी निवडणुकीत मतदान करू नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा निर्धार डोंबिवलीकरांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी डोंबिवलीकरांनी रामनगर पोलीस ठाणे ते एस.व्ही.जोशी मार्गावर जनजागृती आणि इशारा मोर्चा काढला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close