मनसेचा नारा, ‘हो, हे शक्य आहे!’

September 22, 2014 4:36 PM3 commentsViews: 15413

109raj_on_modi22 सप्टेंबर : ‘हो, हे शक्य आहे!’ असा नारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहे. तसंच ब्ल्यू प्रिंटचं मनसेच्या प्रचाराच्या अजेंड्यावर असणार आहे आणि यासाठीच ‘हो, हे शक्य आहे!’ अशी टॅगलाईन मनसेची असणार आहे. शिवसेनेनं चला उठा,महाराष्ट्र घडवूया अशी टॅगलाईन दिलीये त्याला उत्तर देर मनसेनं ‘हो,हे शक्य आहे!’ अशी टॅगलाईन काढली आहे.

अखेर मनसेच्या बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंटला मुहूर्त मिळाला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहे. यासाठी ‘हो, हे शक्य आहे!’ अशी टॅगलाईन ठरवण्यात आलीय. ही ब्लू प्रिंटच मनसेच्या प्रचाराचा अजेंडा असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेवेळी म्हणजे तब्बल 9 वर्षांपूर्वी या ब्ल्यू प्रिंटचं आश्वासन दिलं होतं. ती आता प्रसिद्ध होतेय. त्याबद्दल उत्सुकता आहेच. ‘येस वुई कॅन’ म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या प्रचार सभांमधून ‘येस वुई कॅन’चा नारा दिला होता. विशेष म्हणजे शिवसेनेनं महापालिका निवडणुकीत ‘करून दाखवलं’ अशी टॅगलाईन वापरली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेनं ‘चला उठा महाराष्ट्र घडवूया’ अशी टॅगलाईन वापरली आहे. त्याचधर्तीवर आता मनसेनंही ‘हो, हे शक्य आहे!’ अशी टॅगलाईन असणार आहे. तेव्हा मनसेला ‘हो, हे शक्य आहे’ ही टॅगलाईन निवडणुकीत यश मिळवून देईल का, हे पहावं लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • shayaran

  YES … Anything can happen ..
  All the Best to MNS !!!

 • DiSh

  The number of times the you have repeated yourself by using the words, Tagline, Raj Thakeray, Blue print or the whole tag line makes you feel this article was written when the write could not think of anything else and kept repeating nonsense going in circles ! Fall of Marathi Journalism !

 • http://www.panoramio.com/user/6719400 Ankush Samrut

  ‘हो, हे शक्य आहे!’…..Really But Many Problem Face in real Position & Actual Government System

  Don’t back to go

close