डीएमके देणार काँग्रेसला बाहेरून पाठिंबा

May 21, 2009 4:28 PM0 commentsViews: 1

21 मे शपथविधीच्या काही तास आधी डीएमकेने मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळात सामील होणार नसून काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देणार, अशी घोषणा डीएमकेचे नेते टी.आर.बालू यांनी केली आहे. डीएमकेला सहा मंत्रीपदं हवी आहेत. पण तो प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाहीये. त्यामुळे काँग्रेसने डीएमकेला बाहेरून पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. डीएमकेचे नेते करूणानिधी उद्या याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत.

close