स्पेशल रिपोर्ट : नरेंद्र मोदींची अमेरिकावारी !

September 22, 2014 11:30 PM0 commentsViews: 1954

22 सप्टेंबर : येत्या 25 तारखेला सुरू होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याकडे सार्‍या जगाचं लक्ष लागलंय. मोदींची ही अमेरिका भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे.

हाऊसफुल्ल…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं न्यूयॉर्कमध्ये होणार्‍या भाषणासाठी प्रवेश मिळवणं कठीण आहे. या कार्यक्रमासाठी जागतिक स्तरावरच्या अनेक दिग्गजांनी बुकींग केलंय. त्यात राजकारणी, विचारवंत इतकंच काय प्रसिद्ध संगीतकारांचाही समावेश आहे. तब्बल 18 हजार लोक या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाच्या तिकिटांची मागणी इतकी प्रचंड आहे की आयोजकांनी मोदींचं भाषण
लाईव्ह दाखवण्यासाठी आता टाईम स्वेअरच आरक्षित केलंय.

मुख्य आयोजक भारत बाराई म्हणतात, मोदी हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. तरुणांना त्यांना भेटण्याची आणि त्यांचं भाषण ऐकण्याची इच्छा आहे.

पण हे सगळं करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. या कार्यक्रमासाठी 15 लाख डॉलर्सचा खर्च येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. आणि कुणाकडूनही 50 हजार डॉलरपेक्षा जास्त देणगी घेऊ नका, अशी सूचना मोदींनी केलीय.

एका प्रभावी देशाचा प्रभावी प्रतिनिधी म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही सर्व तयारी सुरू आहे. मोदींना जवळून पाहण्याची संधी मिळालेल्या लोकांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी याठिकाणी बोलावण्यात आलंय. मोदींची ही अमेरिका भेट अविस्मरणीय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close