पहिल्या टप्प्यात 19 मंत्र्यांचा शपथविधी

May 22, 2009 8:39 AM0 commentsViews: 1

22 मे,डॉ. मनमोहन सिंग यांचा शपथविधी आज शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. नव्या मंत्रीमंडळासाठी काऊण्टडाऊन सुरू झालं आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाच्या यादीवरुन चर्चा सुरु आहे. कॅबिनेट मंत्र्यांचा दोन टप्प्यात शपथविधी होणार असून आज शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता मनमोहनसिंगांच्या केंदय मंत्रिमंडळाचा शपथविधी होतोय. फक्त कॅबिनेट दर्जाच्या 19 मंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे, तर मंगळवारी 5 जणांचा शपथविधी होणार असल्याचं समजतंय. परराष्ट्र खातं प्रणव मुखर्जी यांच्याकडेतर गृहखातं पी. चिदम्बरम यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्याकाही वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी एक बैठकघेतली. ही बैठक नुकतीच संपली आहे. आता लवकरच मनमोहनसिंग खातेवाटपही करतील. या मंत्रीमंडळात कोणाच्या तपश्चर्येला फळ येईल आणि कोणाच्या नाही हे अजून नक्की व्हायचंय. तरीही मंत्रीमंडळात सहभागी होणार्‍या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी आयबीएन लोकमतला मिळाली आहे. या माहितीनुसार मंत्रीमंडळात अंबिका सोनी, मीरा कुमार, प्रणव मुखर्जी, चिदंबरम, अँन्टोनी, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, जयपाल रेड्डी, मुरली देवरा, सुशील कुमार शिंदे, ममता, शरद पवार यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close