रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण : दोषी मनोहर कदम यांना जामीन मंजूर

May 22, 2009 10:44 AM0 commentsViews: 70

22 मे,रमाबाई नगर गोळीबार प्रकरणातला दोषी मनोहर कदम याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. कदमला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. 7 मे 2009 ला शिवडी कोर्टानं रमाबाई नगर गोळीबार प्रकरणी मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणात जन्मठेप झालेल्या पोलीस उपनिरिक्षक मनोहर कदम याने जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. मनोहर कदम याला शिवडी इथल्या सेशन कोर्टाने 7 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याबाबत कदमने मुंबई हायकोर्टत अपील याचिका तसंच जामीनासाठी अर्ज केलाय. गेले दोन दिवस या अर्जावर सुनावणी सुरु आहे. आज कदम याचे वकिल राजा ठाकरे पुन्हा एकदा टँकर स्टोरी सांगू लागले. पण कदम याला गेल्या 12 वर्षांत कशा प्रकारे वाचवण्यात येत आहे, याचा पाढाच वाचला. दरम्यान या अर्जावर उद्या 23 मे ला शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

close