युती होणारच, आज शिक्कामोर्तब ?

September 23, 2014 7:03 PM0 commentsViews: 8603

amit shah meet udhav23 सप्टेंबर : अखेर शिवसेना-भाजप युती होणार हे आता निश्चित झालंय. शिवसेना आणि भाजपच्या बैठकीत युती टिकावी, यावर
शिक्कामोर्तब झाल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. या बैठकीत जागा वाटपाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या नव्या प्रस्तावावर आज (मंगळवारी) संध्याकाळी मित्रपक्षांबरोबर चर्चा होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना 151, भाजप 130 आणि मित्रपक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेना आपल्या कोट्यातल्या 3 ते 4 जागा आणि भाजप आपल्या कोट्यातल्या 6 जागा मित्रपक्षांना देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रपक्षांना एकूण 17 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळच्या बैठकीनंतर महायुतीत समेट होईल, असं दिसतंय.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपची बैठक भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीला शिवसेनेतर्फे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई तर भाजपचे विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे उपस्थित होत्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युती अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून युती टिकली पाहिजे असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता युतीची घोषणा कधी होते हे पाहण्याचं ठरेल.

नवा फॉर्म्युला

  • शिवसेना – 151
  • भाजप – 130
  • मित्रपक्ष – 7

मित्रपक्षांसाठी अतिरिक्त जागा
शिवसेना 3-4 जागा सोडण्याची शक्यता
भाजप 6 जागा सोडण्याची शक्यता

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close