नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातल्या शहीद पोलिसांना मानवंदना

May 22, 2009 10:57 AM0 commentsViews: 2

22 मे, गडचिरोलीत धानोर्‍यामध्ये भू-सुरुंगाचा स्फोट होऊन झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातील शहीद पोलीसांना मानवंदना देण्यात आली. आज शुक्रवारी सकाळीच या शहीदांचे मृतदेह इथे आणण्यात आले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागरिकही हेलावून गेले. शहीदांमध्ये 5 महिला पोलीसांचाही समावेश आहे. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गृहमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यानंतर पोलिसांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासाठी गडचिरोलीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close