मोदींचा अमेरिकेचा दौरा 25 ऐवजी 26 सप्टेंबरपासून !

September 23, 2014 5:15 PM0 commentsViews: 899

PM Narendra Modis Teachers Day Speech23 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित अमेरिका दौरा एका दिवसांने पुढे ढकलण्यात आलाय. पंतप्रधान मोदी आता 25 ऐवजी 26 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौर्‍यावर रवाना होणार आहे. मोदींच्या या दौर्‍याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय.

मोदींची ही अमेरिका भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेतलं कॉर्पोरेट वर्ल्ड आणि तिथल्या भारतीयांची उत्सुक्ता शिगेला पोहोचलीय. व्हाईट हाऊसमध्येही मोदींना ग्रँड वेलकम मिळणार आहे.

मोदींच्या न्युयॉर्कमधल्या भाषणासाठी तर तिकिटंही मिळेनासे झाले आहेत. तब्बल 18 हजार लोक या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाच्या तिकिटांची मागणी इतकी प्रचंड आहे की, आयोजकांनी मोदींचं भाषण लाईव्ह दाखवण्यासाठी आता टाईम स्वेअरच आरक्षित केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close