काँग्रेसचा प्रस्ताव मान्य नाही;आपल्याच मागण्यांवर ठाम राहणार – एम. करूणानिधी

May 22, 2009 12:24 PM0 commentsViews: 3

22 मे,काँग्रेसचा प्रस्ताव आपल्याला मान्य नसून द्रमुक आपल्या मागण्यांवर ठाम आहे, असं द्रमुकचे प्रमुख एम. करूणानिधी यांनी म्हटलंय. काँग्रेसशी बोलणी फिसकटल्याने एम. करूणानिधी आज चेन्नईला रवाना झाले. त्याआधी त्यांनी पत्रकारांना आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं सांगितलं. तसच काँग्रेसने दिलेल्या फॉर्मुल्यावर आता निर्णय घेऊ शकत नाही. डीएमकेच्या इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन, असंही करूणानिधींनी सांगितलंय. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यात बैठक सुरू आहे.

close