भारताची ‘मंगळ’स्वारी यशस्वी

September 24, 2014 8:46 AM4 commentsViews: 3681

Mission mars

23 सप्टेंबर : भारताची महत्वकांक्षी मोहीम ‘मिशन मार्स’ आज बुधवारी सकाळी यशस्वीपणे पार पडली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी आज (बुधवारी) पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या मंगळ झेप घेत, अंतराळ क्षेत्रा ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. मंगळ मोहीम यशस्वी झाल्याने भारत आता मंगळ मोहीम पूर्ण करणार्‍या अमेरिका, रशिया आणि युरोपियन महासंघाच्या रांगेत जाऊन बसला आहे. तर मंगळ मोहीम यशस्वी करणारा आशियातील पहिलाच देश म्हणून भारताची नोंद घेतली जाणार असल्याने इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला इस्त्रोने पीएसएलव्हीच्या सहाय्याने मंगळयानाचे प्रक्षेपण केले होते. डिसेंबरमध्ये हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाच्या दिशेने कूच करत होते. मिशन मार्सच्या शेवटच्या टप्प्यातील इंजिनाची चाचणी सोमवारी यशस्वी झाल्याने ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. शास्त्रज्ञांच्या या अथक मेहनतीचे फळ बुधवारी दिसून आले. आज सकाळी अगदी भल्या पहाटे मंगळाच्या कक्षेतमध्ये प्रवेश करण्यात मंगळयानाला यश आले. आतापर्यंत युरोपीयन स्पेस एजन्सीचंच यान पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळापर्यंत पोहचू शकलं आहे. नासा युरोपीयन स्पेस एजन्सी आणि सोव्हीयत युनियनचेच मंगळावर यान पाठवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मंगळयान पोहोचलं तर भारत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारा दुसरा देश ठरला आहे.

मंगळयानाच्या या प्रवासाविषयी शास्त्रज्ञ सुरेश नाईक म्हणाले, मंगळयानाचा वेग वाढवण्यात आला व यानंतर मंगळयानाला पृथ्वीच्या कक्षेतून सुर्याच्या कक्षेमध्ये नेण्यात आले. आता मंगळाच्या जवळ पोहोचल्यावर मंगळाच्या गुरुत्वाकार्षणाचा आधार घेत हे यान मंगळाच्या कक्षेत शिरले. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी हेच सर्वात मोठे आव्हान होते असे नाईक यांनी सांगितले. या मंगळयानाकडे देशातल्याच नाही तर परदेशातल्याही अनेक लोकांचं लक्ष लागलं आहे होतं. त्यामुळे हा क्षण सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

अशी होती ‘मंगळ’वारी

 • पहाटे 4 वा. 17 मि. – मंगळाच्या कक्षेत प्रवेशाला सुरुवात झाली
 • सकाळी 6 वा. 56 मि. -यानाला योग्य दिशेने वळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली
 • 7 वा. 12 मि. – मंगळयान मंगळाच्या पलीकडच्या बाजूला जायला सुरुवात झाली
 • 7 वा. 17 मि. – लिक्विड इंजिन प्रज्वलित झालं
 • 7 वा. 21 मि. – पृथ्वी आणि मंगळयानाच्या मध्ये मंगळ आला
 • 7 वा. 22 मि. – मंगळयान आणि इस्रोच्या कंट्रोल रूमचा संपर्क तुटला
 • 7 वा. 30 मि. – इंजिन प्रज्वलित झाल्याची खात्री झाली
 • 7 वा. 41 मि. – लिक्विड इंजिन बंद झालं
 • 7 वा. 52 मि. – मंगळयान मंगळाच्या नियोजित कक्षेत फिरायला सुरुवात केली
 • 8 वा. 30 मि. – मंगळयानाकडून सिग्नल येणार
 • 24 तासांच्या आत मंगळयान मंगळाची माहिती पाठवायला सुरुवात करणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Nagesh Jadhav

  congrats to isro members,,,,,, we proud on you:-)
  From Nagesh Jadhav

 • Kiran Gaikwad

  Congractulation All ISRO Scientist And India

 • sambhu

  Congractulation to all who work directly and indirectly for these great achievement.

 • atul kamble

  mangalala ashubh maananarya lokansathi hi ek wait baatami….. congrats Team ISRO..!!!!

close