भारतीय शास्त्रज्ञांचा अभिमान – मोदी

September 24, 2014 10:35 AM0 commentsViews: 1831

Modi on MOM

23 सप्टेंबर : भारताची मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे. शास्त्रज्ञांच्या कामाचे कौतुक करताना प्रत्येक भारतीयाला शास्त्रज्ञांवर अभिमान असल्याचे यावेळी मोदीनी सांगितलं. क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर जसा आनंदोस्तव साजरा केला जोतो तसचं आज मंगळ मोहिम यशस्वी झाल्याबद्दल, देशभरात आनंदोस्तव साजरा केला पाहिजे. सकाळी साडे सहाच्या सुमारास मोदी इस्रोमध्ये दाखल झाले. ते या संपूर्ण प्रक्रियेचे साक्षीदार बनले असून त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.

मॉमचे मंगळाशी मिलन झालं. मार्स ऑर्बिटर मिशनचा शॉर्ट फॉर्म जेव्हा मॉम तयार झाला तेव्हाच मला ही मोहीम यशस्वी होणार याचा विश्वास होता. कारण ‘मॉम’कधी निराश करत नाही. मंगळ मोहीम यशस्वी झाल्याबाबत मी सर्वांचे अभिनंदन. या ऐतिहासिक क्षणी मी सर्व शास्त्रज्ञांबरोबरच सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. अत्यंत कमी सुविधा असूनही एवढे मोठे यश मिळवणे ही केवळ शास्त्रज्ञांच्या कामाप्रति असलेल्या निष्ठेचा परिणाम आहे, असे सांगत मोदींनी शास्त्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

‘कमी साधने, अनेक मर्यादा असूनही एवढी मोहिम फत्ते झाल्याने शास्त्रज्ञ खूप अभिनंदनास पात्र आहेत. 65 कोटी किलोमीटर पार करून हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले आहे. एवढे मोठे अंतर असूनही आपण ते यशस्वीरित्या पार केले आहे. हे मिशन पार करण खूप अवघड होतं पण, भारताने पहिल्या प्रयत्नातच हे यश मिळविले आहे. फक्त तीन वर्षांत आपण मंगळावर पोहचण्याची ही सर्व मोहिम पूर्ण केली आहे. त्यामुळे सर्व भारतीय शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. हॉलिवूडमधील चित्रपटांवरही यापेक्षा जास्त खर्च होतो. पण, त्यापेक्षा कमी खर्चात आपण ही मोहिम फत्ते केलं असल्याचंही ते म्हणाले.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अशक्य गोष्टी शक्य बनविण्याची सवय लागली आहे. मला शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास हे त्याचेच फळ आहे. भारताने जपान आणि चीनला मागे टाकल्याचा आनंद आहे. इस्त्रोमधला प्रत्येक शास्त्रज्ञ कौतुकास पात्र आहे. शास्त्रज्ञांनी नवी पिढी घडविण्याचे काम होत आहे. त्यामुळे युवा शास्त्रज्ञांवरही नवी पिढी बनविण्याचे जबाबदारी आहे. धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही असंही ते म्हणाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे जल्लोष साजरा केला जातो. तसा आज भारतातील प्रत्येक नागरिकांने आपल्या या यशस्वी मोहिमेबद्दल जल्लोष साजरा करावा, असे सांगत मोदी म्हणाले, की काम मंगळ असल्यास सर्व काही मंगळ होते.

दरम्यान, राष्ट्रपतींनाही ‘इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. भारताची ‘मंगळ मोहीम’ यशस्वी पार करून ‘इस्रोच्या शास्त्रज्ञांनी इतिहास घडवला आहे, असं ते म्हणाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close