सुप्रीम कोर्टाचा दणका, 214 कोळसा खाणींचे परवाने रद्द

September 24, 2014 4:30 PM0 commentsViews: 525

sc on coal scam24 सप्टेंबर : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कोळसा खाण उद्योगाला आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने आज आणखी एक जोरदार धक्का दिला. 1993 ते 2008 या कालावधीत वाटप झालेल्या 214 कोळसा खाणींचे परवाने रद्द केले आहेत. यापैकी सरकारी कंपन्यांच्या मालकीच्या फक्त 4 खाणींनी निकष पूर्ण केले होते, त्यांचे परवाने कायम राखण्यात आले आहेत. एनटीपीसी आणि सेल या कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाने या अगोदरच कोळसा खाण वाटपावर टाच आणली होती. आज यावर आपला निर्णय देत कोर्टाने 214 कोळसा खाणीचे दुकानं बंद केले आहे. तसंच मध्य प्रदेशातला एक मेगा प्रकल्प सुरू राहणार आहे. उरलेल्या खाणमालकांना 6 महिन्यांमध्ये सुप्रीम कोर्टाला उत्तर दिलंय. दरम्यान, या काळात सीबीआय चौकशीही सुरू राहील असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. रद्द झालेल्या सर्व खाणींना प्रतिटन 295 रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिलीये. कॅगच्या अहवालावर आधारित हा दंड ठरवण्यात आलाय. तसंच 6 महिन्यांनी म्हणजे मार्च 2015नंतर रद्द झालेल्या सर्व कोळसा खाणींचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा आहे, असंही रोहतगी यांनी स्पष्ट केलंय. पुढच्या लिलावासाठी केंद्र सरकारला पारदर्शक पद्धत अवलंबन आवश्यक आहे. परवाने रद्द झालेल्या खाणमालकांशी केंद्र सरकार चर्चा करेल असं सूत्रांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close