‘त्या’ 7 जागा आम्हाला दिल्यास युतीसोबतच राहणार -आठवले

September 24, 2014 5:37 PM0 commentsViews: 3241

ramdas athawale on 7 seats24 सप्टेंबर : एकीकडे महायुतीत घटकपक्ष कमी जागा वाट्याला मिळत असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळाच सूर लगावलाय.

शिवसेना भाजपनं घटक पक्षांना 7 जागा देऊ केल्यात जर त्या जागा मला एकट्याला दिल्या तर मी युतीसोबत राहीन, असं स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. मात्र, 7 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

तसंच राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय चुकीचा ठरणार नाही असंही आठवले म्हणाले. जर मला जागा दिल्या नाहीतर मी सेनेसोबत जायचं की भाजपसोबत याचा निर्णय आणखी घेतला नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या संपर्कात आहे असा इशाराही आठवलेंनी दिला. एवढेच नाहीतर भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेट झाली असून त्यांनी मंत्रीपदाबद्दल आश्वासन दिलं असंही आठवलेंनी सांगितलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close