मनसेची पहिली 27 संभाव्य उमेदवारांची यादी तयार

September 24, 2014 6:24 PM2 commentsViews: 27664

mns first list24 सप्टेंबर : एकीकडे महायुती आणि आघाडीत जागावाटपावरून ओढताण सुरू आहे मात्र मित्रपक्ष,आघाडी, युतीच्या फंद्यात नसलेल्या मनसेनं आपल्या उमेदवाराची यादी तयार केली आहे. 27 उमेदवारांची ही यादी असून पितृपक्ष संपताच जाहीर करणार असल्याचं कळतंय. आयबीएन लोकमतच्या हाती ही यादी लागली आहे. ही यादी उद्याच्या ब्ल्यू प्रिंट कार्यक्रमात सादर होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत सुपाडा साफ झालेल्या मनसेनं विधानसभेसाठी कंबर कसली. खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण विधानसभेला उभे राहणार अशी गर्जना केली पण अजूनही त्यांनी हा निर्णय गुलदस्त्याच ठेवलाय. त्यामुळे त्यावरही सस्पेंस कायम आहे. त्यातच बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट उद्या म्हणजे 25 सप्टेंबरला जाहीर करण्याचं ठरलंय. तर दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून उमेदवारांचा मुलाखती घेतल्यात. अखेरीस मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी तयार झाली आहे. ही यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये. या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदीलही मिळाला आहे. पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांबरोबर पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या काही उमेदवारांची नावं देखील आहेत. मुंबई माहीममधून नितीन सरदेसाई, मागाठणेतून प्रवीण दरेकर, विक्रोळीतून मंगेश सांगळे, भांडूपमधून शिषीर शिंदे आणि नाशिकमधून वसंत गिते यांची नाव निश्चित झालीये. तर राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकल्यामुळे घाटकोपरमधून नयन कदम यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर पुण्यात कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर मराठवाड्यात एकमेव जागा असलेल्या कन्नडमधून हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला मागील वर्षी रामराम ठोकला होता. त्यामुळे औरंगाबादेतून सुमित खांबेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

कोण आहेत मनसेचे संभाव्य उमेदवार ?

1) नितीन सरदेसाई, माहीम
2) प्रवीण दरेकर, मागाठणे
3) मंगेश सांगळे, विक्रोळी
4) शिषीर शिंदे, भांडूप
5) सत्यवान दळवी, मुलूंड
6) नयन कदम, बोरीवली
7) दिलिप लांडे, घाटकोपर
8) ईश्वर तायडे, चांदिवली
9) स्नेहल जाधव, कुर्ला
10) राजा चौगुले, चेंबुर
11) भालचंद्र आंबरे, जोगेश्वरी
12) शालिनी ठाकरे, दिंडोशी
13) दिलिप पवार, मलाड
14) संजय नाईक, भायखळा
15) राजेंद्र शिरोडकर, मलबार हिल
16) वसंत गिते, नाशिक मध्य
17) रमेश पाटील, कल्याण ग्रामीण
18) मंदार हळबे, डोंबिवली
19) किशोर शिंदे, कोथरूड
20) अतूल भगत, उरण
21) राजू उंबरकर, वणी
22) विनोद वाघ, सिंदखेडराजा
23) सुमित खांबेकर, औरंगाबाद
24) अभय साळूंखे, निलंगा
25) लालीत कोल्हे, जळगाव
26) प्रकाश भोईर, कल्याण
27) राजू फुंडकर, अकोट

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayak Belose

    २८. वैभव खेडेकर, खेद-दापोली-mandangad

  • VINOD

    VIDHAN SABHET “MATAA JAGDAMBA” TUMHALA YASH DEVO HICH PRARTHANA

close