आता चर्चा पुरे, थेट निर्णयच जाहीर करू -मुख्यमंत्री

September 24, 2014 7:48 PM2 commentsViews: 1691

cm on karad news24 सप्टेंबर : जागावाटपावरून आघाडीतला बेबनाव कायम आहे. राष्ट्रवादी अजूनही काँग्रेसच्या निरोपाची वाट बघत आहे. पण चर्चा खूप झाली आता बैठकांची गरज नाही आता थेट निर्णय जाहीर होईल असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.

तसंच अशक्य अटी घातल्या तर आघाडी होणं कठीण आहे, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पूर्वअटी घातल्या नसत्या तर आतापर्यंत आघाडी झाली असती असं मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला सुनावले.

  काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव दिला असून 14 मतदारसंघाची नावंही कळवली आहे.   मात्र राष्ट्रवादीकडून कोणताच निरोप न आल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता पसरलीये. काँग्रेसबरोबर जागांबाबत तडजोड करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. पण अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदची मागणी सोडायची नाही, असं राष्ट्रवादीनं ठरवलंय. दरम्यान, काल पुढे ढकलण्यात आलेली आघाडीची बैठक आजही होईल की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    देशातील नेतेमंडळी अंध:श्रध्देत गुरफटली असेल तर सामान्य जनतेतील अंध:श्रध्दा कशी कमी होणार? “जसा राजा तशी प्रजा” अशी एक म्हण आहे.

  • Sham Dhumal

    पितृपक्ष आमावश्या संपण्याची वाट पाहिली का?

close