‘मंगल’ पहाट…,इस्त्रोच्या मुख्यालयातला ‘तो’ क्षण !

September 24, 2014 9:46 PM0 commentsViews: 2390

24 सप्टेंबर : मंगळयान मोहिमेचा परमोच्च क्षण आला. मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचं इस्रोच्या शास्ज्ञानी जाहीर केलं. यानंतर भारताची ओळख बदलली. मंगळावर यान पाठवणारा देश म्हणून अभिमानानं आपली मान उंचावली. असा क्षण पुन्हापुन्हा येत नाही. असा क्षण इतिहासात एकदाच येतो.

24 सप्टेंबर 2014… ची सकाळ भारतासाठीच नव्हे तर जगाच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. ‘टाळ्यांच्या कडकडाट…’ इस्रोच्या बंगळुरूमधल्या मुख्यालयातला हा जल्लोष थेट अंतराळात घुमत होता..कारण भारताचं मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत जाऊन पोहोचलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. इस्रोच्या कंट्रोल रूममध्ये सगळ्या शास्त्रज्ञांच्यासोबत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणं हा जगावेगळा अनुभव होता.

मंगळयान मंगळाच्या कक्षेत फिरायला सुरूवात झाल्यानंतर आता मंगळाची माहिती इस्रोकडे यायला लागलीय. या यानावरचा मार्स कलर कॅमेरा मंगळाची छायाचित्रं पाठवणार आहे पण त्याचबरोबर मंगळाचा पृष्ठभाग, मंगळावरचं वातावरण याची महत्त्वाची माहितीही आपल्याला मिळणार आहे.

ही मंगळयान मोहीम इस्रोच्या शास्त्रज्ञांचा तंत्रज्ञानाबद्दलचा आत्मविश्वास उंचावणारी आहे. पण त्याहीपेक्षा मंगळाबद्दलच्या संशोधनात भारताची मोलाची भर पडणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close