नेटवर्क 18 ग्रुप आणि फोर्ब्स्‌चं बिझनेस मॅगझिन

May 22, 2009 4:54 PM0 commentsViews: 4

22 मे,नेटवर्क 18 ग्रुप आणि फोर्ब्स्‌नं संयुक्तरित्या सुरु केलेल्या बिझनेस मॅगझिनचं काल 21 मे ला मुंबईत शानदार लाँचिंग झालं. मुंबईत ताज हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याला नेटवर्क 18 ग्रुपचे संपादक राघव बहल आणि फोर्ब्सचे अध्यक्ष स्टीव फोर्ब्स उपस्थित होते. फोर्ब्स हा आंतरराष्ट्रीय बिझनेस ग्रुप आता भारतात प्रवेश करतोय. त्यासाठीच फोर्ब्सनं नेटवर्क 18 ग्रुपशी करार केलाय. नेटवर्क 18 ग्रुप आता टीव्ही आणि इंटरनेट मीडियानंतर आता प्रिंट मीडियातही पदार्पण करतोय. या नव्या मॅगझिनमध्ये जगभरातल्या बिझनेस घडामोडी असतीलच, पण त्याचबरोबर भारतीय शेअरमार्केट आणि व्यापार जगतातल्या घडामोडींचीही माहिती मिळवता येईल.

close