काँग्रेसची राष्ट्रवादीवर कुरघोडी, पहिली यादी झळकावली

September 25, 2014 12:33 AM1 commentViews: 7743

cogress list25 सप्टेंबर :जागावाटपाचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने राष्ट्रवादीला ठेंगा दाखवत आपली पहिली 118 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सात मंत्र्यांचा सहभाग असलेली पहिली यादी काँग्रेसने झळकावली आहे. काँग्रेसनं रात्री उशिरा 118 उमेदवारांची यादी पहिली यादी जाहीर केलीय.

कराड दक्षिणमधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे विलासकाका उंडाळकर यांचा पत्ता कट झालाय. तर कुडाळमधून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. पहिल्या यादीत राजेंद्र दर्डा, प्रणिती शिंदे, सुशीबेन शहा यांची नावं आहेत.

त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेचिरंजिव अमित देशमुख यांना लातूर शहरातून तिकीट देण्यात आलंय. या यादीत काही वादग्रस्त नावंही जाहीर झाली.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झालेले कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. काँग्रेसने सर्वात आधी बाजी मारत यादी जाहीर केलीये. मात्र राष्ट्रवादीवर यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची पहिली 118 उमेदवारांची यादी

दक्षिण कराड – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कुडाळ – नारायण राणे
अक्कलकुवा – ऍड. के. सी. पाडवी
शहादा – पद्माकर वळवी
नवापूर – सुरुपसिंग नाईक
साखरी – धनाजी अहिरे
सिंदखेडराजा – शामकांत सानेर
शिरपूर – काशिराम पवार
रावेर – शिरीष चौधरी
जामनेर – जोत्स्ना विसपुते
बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ
चिखली – राहुल बोंडरे
खामगाव – दिलीपकुमार सानंदा
अकोट -महेश गांगणे
बाळापूर – सय्यद खतीब
रिसोड – अमित झनक
धामणगाव रेल्वे – वीरेंद्र जगताप
तिवसा – यशोमती ठाकूर
मेळघाट – केवलराम काळे
अचलपूर – अनिरुद्ध देशमुख
आर्वी – अमर काळे
देवळी – रणजीत कांबळे
सावनेर – सुनील केदार
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल गुडदे
नागपूर दक्षिण – सतीश चतुर्वेदी
नागपूर पूर्व – अभिजीत वंजारी
नागपूर मध्य – अनीस अहमद
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे
नागपूर उत्तर – नितीन राऊत
रामटेक – सुबोध मोहिते
तुमसर – प्रमोद तित्तरमारे
साकोली – सेवक वाघये
गोंदिया -गोपालदास अग्रवाल
आमगाव – रामरतनबापू राऊत
आरमोरी – आनंदराव गेडाम
गडचिरोली – सौगुणा ताळंदी
राजुरा -सुभाष धोटे
ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार
चिमूर -अविनाश वारजुरकर
वणी – वामनराव कासावार
राळेगाव – वसंत पुरके
उमरखेड -विजयराव खडसे
हादगाव – माधवराव पवार
नांदेड उत्तर – बी.पी. सावंत
नांदेड दक्षिण – ओमप्रकाश पोकर्णा
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर
मुखेड – हनुमंतराव पाटील
कळमनुरी -संतोष तारफे
हिंगोली – भाऊराव पाटील
जिंतूर – रामप्रसाद बोर्डिकर
जालना – कैलास गोरंटियाल
सिल्लोड – अब्दुल सत्तार अब्दुल नाबी
फुलंब्री – कल्याण काळे
औरंगाबाद पश्चिम – जितेंद्र देहाडे
औरंगाबाद पूर्व – राजेंद्र दर्डा
वैजापूर – दिनेश परदेशी
मालेगाव मध्य – शेख आसीफ शेख रशीद
नाशिक मध्य – शाहू खैरे
इगतपुरी – निर्मला गावित
पालघर – राजेंद्र गावित
वसई -मायकल फुरताडो
भिवंडी पश्चिम – शोएब खान
ओवाळा माजीवडा – प्रतिभा पाटील
ठाणे – नारायण पवार
दहिसर – शीतल म्हात्रे
मुलुंड – सप्रा सिंग
जोगेश्वरी पूर्व – राजेश शर्मा
दिंडोशी – राजहंस सिंह
चारकोप -भारत पारेख
मालाड पश्चिम – अस्लम शेख
वर्सोवा – बलदेव खोसा
अंधेरी पश्चिम -अशोक जाधव
अंधेरी पूर्व – सुरेश शेट्टी
विलेपार्ले – कृष्णा हेगडे
चांदिवली – नसीम खान
घाटकोपर पश्चिम – प्रवीण छेडा
चेंबूर – चंद्रकांत हंडोरे
कलिना – कृपाशंकर सिंह
वांद्रे पश्चिम – बाबा सिद्दिकी
धारावी – वर्षा गायकवाड
सायन कोळीवाडा – जगन्नाथ शेट्टी
वडाळा – कालिदास कोळंबकर
भायखळा – मधुकर चव्हाण
मलबारहिल – सुशीबेन शहा
मुंबादेवी – अमिन पटेल
कुलाबा – ऍनी शेखर
उरण – महेंद्र घरत
पेण – रवींद्र पाटील
अलिबाग – मधुकर ठाकूर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
भोर – संग्राम थोपटे
शिवाजीनगर -विनायक निम्हण
पुणे कॅन्टॉनमेंट – रमेश बागवे
कसबा पेठ – रोहित टिळक
संगमनेर – बाळासाहेब थोरात
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूर – भाऊसाहेब कांबळे
अहमदनगर शहर – सत्यजीत तांबे
लातूर ग्रामीण – त्र्यंबक भीसे
लातूर शहर – अमित देशमुख
निलंगा – अशोक निलंगेकर
औसा – बसवराज पाटील
उमरगा – किसन कांबळे
तुळजापूर – मधुकरराव चव्हाण
सोलापूर शहर उत्तर – विश्वनाथ चकोटे
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे
अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे
सोलापूर दक्षिण – दिलीप माने
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
राजापूर – राजेंद्र देसाई
कुडाळ – नारायण राणे
कोल्हापूर दक्षिण – सतेज पाटील
करवीर – पी.एन. पाटील
कोल्हापूर उत्तर – सत्यजीत कदम
हातकणंगले – जयंत आवळे
इचलकरंजी – प्रकाश आवाडे
शिरोळ – आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील
सांगली – मदन पाटील
पलूस कडेगाव – पतंगराव कदम
खानापूर – सदाशिवराव पाटील

लातूर शहर-अमित देशमुख

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ketan

    मुख्यमंत्री हे स्वछय प्रतिमेचे आहेत त्यांनी कृपा सारख्या गुन्हेगार व्यक्तीसोबत राहू नये

close