मनसेची बहुप्रतिक्षित ब्लू प्रिंट अखेर आज होणार प्रसिद्ध

September 25, 2014 9:28 AM0 commentsViews: 4711

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray5

25 सप्टेंबर :  महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)ची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंन्ट’ अखेर आजचा मुहूर्त सापडला आहे. माटुंग्याच्या षन्मुखानंद हॉलमध्ये मनसैनिकांच्या उपस्थीतीत स्वता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही ब्ल्यु प्रिंट म्हणजेच ‘महाराष्ट्राच्या विकासाचा आराखाडा’ सादर करणार आहेत. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू’, असं आश्वासन देत, आपल्या स्वप्नातला महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी 8 वर्षांपूर्वी मनसेची स्थापना करताना आपल्या पहिल्या सभेत केली होती. अखेर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंट सादर होत आहे.

षन्मुखानंद हॉलमध्ये होणार्‍या या कार्यक्रमासाठी मनसे कंबर कसून कामाला लागली असून सोशल मीडियात कलात्मक फोटो आणि व्हिडीओ क्लीप अपलोड करण्यात येत आहे. ‘हो, हे शक्य आहे’ अशी टॅगलाईनही या विकास आराखड्यासाठी बनविली आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर मनसे काहीशी बाजूला गेल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊनही पक्षात शांतता आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रकाशित होणार्‍या या ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून राज विधानसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता असल्याने मनसैनिकांमध्ये ते काय बोलणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, मनसेच्या उमेदवारांची पहिली यादीही आज अधिकृतरित्या जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close