एफडीआय म्हणजे ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’ -मोदी

September 25, 2014 1:48 PM0 commentsViews: 1729

make in india neeew

25 सप्टेंबर : मेक इन इंडिया ही केवळ एक नारा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) एफडीआय या संकल्पनेची वेगळी बाजू उद्योगपतींसमोर मांडली. एफडीआय म्हणजे फक्त ‘फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट’ नसून, प्रत्येक भारतीयासाठी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’ असल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘मेक इन इंडिया’ ची घोषणा दिली होती. आज या संकल्पनेचा औपचारिकरित्या मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत शुभारंभ करण्यात आला आहे. अमेरिकेच्या दार्‍यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विज्ञान भवन येथे या योजनेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी makeinindia.com या वेबसाईटचं नरेंद्र मोदींच्या हस्तेप् ा्रकाशन करण्यात आलं. या कार्येक्रमासाठी मुकेश अंबानी, चंदा कोच्चर, अझीम प्रेमजी यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.

यावेळी नरेंद्र मोदींनी उद्योजकांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत मी अनेक उद्योजकांना भेटलो, ते सर्वजण आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी भारताबाहेर जात होते. ही अतिशय दु:खद बाब असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले. उद्योग जगताचा सरकारवर विश्वास असणेही गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.

उद्योग जगतासाठी एफडीआय ही एक चांगली संधी आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी एफडीआय ही एक जबाबादारी आहे. एफडीआय म्हणजे ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’ असे त्यांनी सांगितले. देशात केलेली गुंतवणूक सुरक्षित असून आपला निर्णय योग्य आहे असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे. आपले पैसे बुडणार नाहीत हा विश्वास गुंतवणूकदारांना देणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. दरम्यान, कालच्या ‘मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर कोणीही भारतातील तरूणांच्या गुणवत्तेवर शंका घेणार नाही, असेही ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close