भारताच्या खात्यात आणखीन दोन मेडल्स

September 25, 2014 11:14 AM0 commentsViews: 280

swarnsingh_1208getty_630

25 सप्टेंबर : एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आज आणखीन दोन मेडल्स जमा झाले आहेत. रोईंगच्या स्पर्धेत भारताच्या स्वर्ण सिंगने ब्राँझ मेडल पटकावलं आहे तर पुरुषांच्या संघानंही रोईंगमध्येच मिळवलं ब्राँझ मेडल मिळालं आहे. स्वर्णने सुरूवात एकदम दमदार केली होती. अर्ध्या अंतरापर्यंत तो पहिल्या क्रमांकावर होता पण त्यांनंतर इराणच्या मोहसेन शादीन आगा याने आघाडी घेतली. अंतिम 500 मीटरमध्ये स्वर्ण तग धरू शकला नाही, आणि त्याला ब्राँझवर समाधान मानावं लागलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close