महाराष्ट्रावर भगवा फडकू दे, उद्धवांचं तुळजाभवानीला साकडं

September 25, 2014 4:40 PM0 commentsViews: 5166

udhav in tuljabhavani25 सप्टेंबर :महाराष्ट्रावर भगवा फडकू दे..असं साकडं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीला घातलंय. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. एकीकडे जागावाटपाचा तिढा सुटायचा नाव घेत नाही पण उद्धव यांनी आपल्या मनातली इच्छा तुळजाभवानीकडे बोलून दाखवलीये. आयबीएन लोकमतला प्रतिक्रिया देताना मात्र उद्धव यांनी महायुतीवर उत्तर देणं टाळलं. महायुतीवर चर्चा सुरू आहे एवढंच म्हणून उद्धव ठाकरेंनी विषय टाळला.

गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला महायुतीतला तिढा पितृपक्ष संपला तरी सुटता सुटत नाहीये. घटकपक्षांच्या महानाराजीनाट्य आता संपले असून आता युतीच्या निर्णयाची वेळ आली आहे. पण शिवसेना आणि भाजपकडून कोणताही चर्चा होत नाहीये. आज सकाळी शिवसेनेकडून उत्तर अपेक्षित होतं. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जागा अदलाबदलीच्या मुद्द्यावर अजूनही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या घोषणेकडे लक्ष लागलंय. दरम्यान, भाजप नेत्यांनी आज शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मेटे भाजपसोबतच असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे.

भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्यास मित्रपक्षांच्या भूमिका काय असू शकते ?

1)विनायक मेटे

- बीडमधून भाजपकडून निवडणूक लढणार
- गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीचा फायदा मिळेल

2)महादेव जानकर
- मुंडे आणि मुंडे कुटुंबाविषयी असलेल्या मैत्रीमुळे महादेव जानकर भाजपच्या गोटात असतील
- मुंडेच्या “माधव”(माळी,धनगर,वंजारी) फॉर्मुल्यातील एक घटक
- इतर ओबीसी पक्षांचा पाठिंबा मिळेल अशी आशा

3) राजू शेट्टी
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये दोन मतप्रवाह
- फुले शाहू आंबेडकरांना मानणारा मोठा मतदार, भाजप सोबत गेल्यावर ही मतं मिळणार नाहीत, असा एक मत प्रवाह
- मोदींची लाट आणि केंद्रात भाजप सरकार पाहता भाजप सोबत जावं असा एक मतप्रवाह.

4) रामदास आठवले
- आरपीआयसमोर दुहेरी पेच
- भाजपच्या कोट्यातून खासदारकी मिळाल्याने भाजपात जावं का?
- थेट भाजपासोबत गेल्यावर दलित मतदार स्वीकारतील का ?

एकीकडे मित्रपक्षाचा तिढा कायम आहे. तर शिवसेना-भाजमध्येही जागावाटपावरून अजून एकमत नाहीय. भाजपला शिवसेनेच्या काही जागा हव्यायत. त्या कोणत्या जागा आहेत ?

-भाजपाला हव्यात शिवसेनेच्या जागा
गुहागर
- आधी भाजपकडे असलेला गुहागर मतदारसंघ 2009 मध्ये रामदास कदम यांच्यासाठी शिवसेनेला दिला होता. भाजपला हा मतदारसंघ आता पुन्हा विनय नातू यांच्यासाठी हवी आहे.

पनवेल
- हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत ठाकूर यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपला हवाय.

कवठेमहांकाळ-तासगांव
- हा मतदारसंघ जागा शिवसेनेकडे आहे, तो आता अजित घोरपडे यांच्यासाठी भाजपाला हवाय.

विलेपार्ले
- शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ आता पराग अळवणी यांच्यासाठी भाजपला हवाय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close