वसईत हॉटेलमध्ये बालकामगाराला केली मारहाण

May 22, 2009 5:34 PM0 commentsViews: 2

22 मे वसईतल्या हॉटेलात एका बालकामगाराला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. चोरी करण्याच्या आरोपावरून त्याला मारहाण करण्यात आली. नंतर त्याला स्क्रू-ड्रायव्हरचे चटकेही देण्यात आले. याप्रकरणात हॉटेल मालक फरार झालाय. माणिकपूर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवा पासी असं या बालकामगाराचं नाव असून त्याचं वय बारा बर्षं आहे. सातीवली इथल्या बालाजी हॉटेलमध्ये तो काम करतो. त्याच्यावर हॉटेल मालकानं मोबाईल चोरल्याचा संशय घेतला. सध्या या बालकामगारावर माणिकपूरमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार होत आहेत.

close