अखेर मनसेची ब्ल्यू प्रिंट सादर

September 25, 2014 11:03 PM3 commentsViews: 15136

mns blue print25 सप्टेंबर : अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर मनसेची ब्ल्यू प्रिंट आज सादर झाली. हा महाराष्ट्राचा विकास आराखडा असून यात कोणतंही राजकारण नाही अशी ग्वाही देत ‘होय, हे शक्य आहे’ असा नारा देत महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सादर केला. आजपर्यंत आश्वासनं नाही तर भुलथापा दिल्या गेल्यात त्यामुळे या आश्वासनाचा वीट आला असून महाराष्ट्रासाठी ठोस आणि आश्वासक असा हा आराखडा सादर करण्यात आला असंही यावेळी राज म्हणाले. तसंच घटस्थापनेला घटस्फोट झाला तरी त्याचा विषय आज नाही असा टोलाही राज यांनी शिवसेना आणि भाजपला लगावला.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असा पक्ष स्थापन केला. आपल्या पहिल्यावहिल्या सभेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट मांडणार असं आश्वासनं दिलं होतं. अखेरीस आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांनी आपल्या पोताड्यातून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंट सादर केली. मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये हजारो मनसैनिकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी ब्ल्यू प्रिंटची वेबसाईटही लाँच करण्यात आली

ब्ल्यू प्रिंट सादर करण्यासाठी उशीर झाला खरा पण त्यावर सारखी टीकाही झाली. पण कोणत्याही गोष्टीला टायमिंग असतो. आधी ब्ल्यू प्रिंट सादर केली असती तर लोक विसरून गेले असते. पण याचा अर्थ असाही नाही की, निवडणुकीच्या तोंडावर ब्ल्यू प्रिंट सादर केली. सगळेजण आपआपला विचार करत आहे आज महाराष्ट्राचा विचार करूयात त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगिण विकासाचा विचार करूनच ब्ल्यू प्रिंट सादर केलीये असं राज यांनी स्पष्ट केलंय. तसंच राज यांनी महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या विकासावर भर दिला.

विकास म्हणजे लोकांचा विकास,विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद, विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी त्यामुळे महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे ‘विकास’. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली. महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा विकास आहे त्यासाठी महाराष्ट्राचा विकास आराखडा बनवताना हे पक्क लक्षात ठेवलं आहे असंही राज म्हणाले. युतीच्या घटस्फोटावर राज यांनी आपल्या शैलीत टोला लगावला. आज घटस्थापनेच्या दिवशी कुणाचा घटस्फोट होत असेल तर त्यावर बोलणं उचित ठरणार नाही असा टोलाच राज यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

ब्ल्यू प्रिंट नव्हे हा महाराष्ट्राचा विकास आराखडा – राज
ब्लू प्रिंटला उशीर होतोय, त्यावर टीकाही झाली – राज
अनेकांना विकासाचं काही देणं घेणं नाही – राज
आजपर्यंत आश्वासनं नाही तर फक्त भुलथापा दिल्या गेल्या -राज
राज्याचा विकास खुंटला, आता आश्वासनांचा वीट आलाय – राज
आपल्याकडे बेसिक सुविधाही नाही – राज
टायमिंगपण पाहावा लागतो, निवडणुकांच्या तोंडावर जाहीर करण्याचा हेतू नाही -राज
यात प्रत्येकाच्या सूचनांचा समावेश – राज
प्रत्येक गोष्टीचं टायमिंग असतं आधी ब्ल्यू प्रिंट आली असती तर विसरले असते -राज
पहिला विकास आराखडा मांडला होता तो सम्राट अशोकांनी -राज ठाकरे
त्यामुळे माझी तुलना अशोक सम्राटांशी होऊ शकत नाही – राज ठाकरे
आजचा विषय राजकीय नाही -राज
फक्त महाराष्ट्राचा विकास हाच विषय आहे -राज
घटस्थापनेला घटस्फोट झाला तरी त्याचा विषय आज नाही, राज यांचा युतीला टोला
सगळेजण आपआपला विचार करत आहे आज महाराष्ट्राचा विचार करू -राज ठाकरे
सर्वांगिण विकासाचा विचार केलाय – राज

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Dnyanesh Avhad

  इतकी वर्षे एका माणसावर टीकेची झोड उठवून दिली होती…कुठे आहे ब्लुप्रिण्ट म्हणून ज्याची तुम्ही चेष्टा करत होता..त्यानेआज महाराष्ट्राच्याविकासासाठी ८ वर्षे पणाला लावली …त्याचे धड ५ मिनिट कौतुकसोडा साधी बातमी दाखवू शकत नाही..हीच का तुमची पत्रकारिता…सारा महाराष्ट्र जिथे डोळे लावून बसलाय तिथे तुम्ही यांची नौटंकी दाखवता … …..
  महाराष्ट्राच्या मुलभूत प्रश्नांना बाजूला सारून घटस्फोट किंवा आघाडीत बिघाडीत याकडे लक्ष वेधणाऱ्या मिडीयाचा जाहीर निषेध.

 • Vinay

  All the Best Raj,

 • pawan

  tika kara faqt

close