केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

May 23, 2009 10:11 AM0 commentsViews: 1

23 मेपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत 19 मंत्र्यांनी काल शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या पहिल्या बैठकीत खातेवाटपावर निर्णय घेण्यात आला. यामध्ये पी. चिदंबरम् यांच्याकडे गृहखातं सोपवण्यात आलं आहे. प्रणव मुखर्जी यांना अर्थखातं, शरद पवारांना कृषिखातं, एस.एम.कृष्णा यांना परराष्ट्रमंत्रालय खातं, ममता बॅनर्जी यांना रेल्वे खातं, कमलनाथ यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य खातं, ए.के.अँटोनींकडे संरक्षण खातं, मुरली देवरांना पेट्रोलियम खातं, कपिल सिब्बल यांच्याकडे मनुष्यबळ विकास खातं, सुशीलकुमार शिंदे ऊर्जामंत्री, अंबिका सोनी यांना पर्यटन खातं, मीरा कुमार यांना सामाजिक न्याय खातं, सी.पी.जोशी यांना ग्रामीण विकास, आनंद शर्मा यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय, जयपाल रेड्डी यांच्याकडे नगरविकास खातं सोपवलं आहे. अर्जुन सिंग, सिताराम ओझा आणि हंसराज भारद्वाज यांच्याकडे महत्त्चाची खाती सोपवणार नसून त्यांना एखाद्याचे राज्याचे राज्यपालपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत खातेवाटपाप्रमाणे पंधराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन एक जूनपासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच लोकसभा अध्यक्षांची निवड तीन जूलला केली जाण्याचंही ठरवलं गेलं. तसंच 31 जुलैपूर्वी बजेट सादर केलं जाणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.

close