एशियन गेम्स: पुरूषांच्या 25 मीटर फायर पिस्टलमध्ये भारताला सिल्व्हर मेडल

September 26, 2014 10:20 AM0 commentsViews: 437

vijaykumar_getty

26 सप्टेंबर :  एशियन गेम्स 2014 मध्ये नेमबाजीत भारतानं सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. पुरूषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात हे सिल्व्हर मेडल मिळालं आहे.

पेंबा तमांग , गुरप्रितसिंग आणि विजयकुमार यांच्या टीमने 1740 पॉईंट्स कमावत हे मेडल मिळवलं आहे. तर अपेक्षेनुसार, चीनने 1742 पॉईंट्ससह गोल्डन मेडल जिंकले, 1739पॉईंट्स मिळविणार्‍या कोरियाला ब्राँझ मेडल मिळालं आहे. भारताचं हे नेमबाजीतलं आठवं मेडल असून आतापर्यंत एकूण 16 मेडल्स भारतीय खेळाडूंनी पटकावले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close