बीड पोटनिवडणुकीसाठी प्रीतम मुंडेंनी भरला उमेदवारी अर्ज

September 26, 2014 2:48 PM0 commentsViews: 4956

pritam munde beed26 सप्टेंबर : बीडच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची मुलगी डॉ.प्रीतम मुंडे यांनी आज (शुक्रवारी) अर्ज भरला. डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे या नावानं त्यांनी अर्ज भरला. यावेळी प्रीतमची मोठी बहीण आमदार पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेही उपस्थित होते.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर इथली जागा रिकामी झाली होती. या जागेवर जर मुंडे कुटुंबीयांपैकी कुणी उभं राहिलं, तर राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. आता काँग्रेस आणि शिवसेना काय भूमिका घेतात, हे पहावं लागेल. ही पोटनिवडणूकही 15 ऑक्टोबरलाच होतेय. गोपीनाथ मुंडेंची एक मुलगी पंकजा या आमदार आहेत. तर त्यांची सर्वात धाकटी मुलगी यशश्री हिचं वय उमेदवारीसाठी लहान पडत असल्यानं प्रीतम यांनी अर्ज भरला आहे. आपण अपघातान राजकारणात आलो असून आपल्या बाबा सारखं विकासाभिमुख राजकारण करणार असल्याच त्यांनी सांगितलं. तर आमदार पंकजा मुंडे यांनी मायक्रो प्लॅनिंग करून ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, महायुतीत फूट पडल्याने शिवसेना बीड लोकसभेसाठी उमेदवार देणार का ? या कडे सगळ्यांचं लक्ष लागल्याने सहज वाटणारी निवडणूक थोडीशी अवघड होणार आहे. कोणीही समोर उमेदवार असला तरी आपण या निवडणुकीत मायक्रो प्लॅनिंग करणार असल्याचं आमदार पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close