राष्ट्रवादीशी युती नाहीच, पण ‘फिक्सिंग’ कुणासोबत ? -फडणवीस

September 26, 2014 3:11 PM1 commentViews: 4825

devendra fadanvis 4426 सप्टेंबर : कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, ज्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला त्यांच्यासोबत युती शक्य नाही असं स्प्षटीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसंच राष्ट्रवादीचं फिक्सिंग कुणासोबत आहे सर्वांना माहित आहे असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.

युतीशी घटस्फोट घेतल्यानंतर भाजपने घटकपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी संध्याकाळी भाजपने पत्रकार परिषद घेऊन युती तोडल्याचं जाहीर केलं. भाजपने घोषणा करताच काही तासातच राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन आघाडीला घटस्फोट देण्याची घोषणा केली. भाजप आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी युती आणि आघाडीला घटस्फोट दिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाच मुद्दा हेरून भाजपने युती तोडल्यानंतर लगेल राष्ट्रवादीने आघाडी तोडल्याची घोषणा कशी केली ? राष्ट्रवादीने अगोदरच आघाडी तोडण्याचा विचार केला होता असा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मात्र आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चेला पूर्णविराम दिलाय. राष्ट्रवादीसोबत कुणाबरोबर युती आहे हे विधानसभेच्या कामकाजातून स्पष्ट होतंय. विधानसभेसाठी राष्ट्रवादीसोबत कुणी फिक्सिंग केलं हे सर्वांना माहिती आहे. आम्ही सातत्याने राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं. तसंच राज्यात भाजपचंच सरकार येईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • kalpesh

    kay mantoy kay mahit?

close