राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ?

September 26, 2014 6:05 PM0 commentsViews: 1441

1mumbai_mantralyat26 सप्टेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यानं राज्य सरकार अल्पमतात आलंय. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानंही राज्यपालांकडे अनौपचारिक चाचपणी सुरू केली आहे.

तर राज्यातही भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलीय. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आलंय तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी भाजपची मागणी आहे.

याबाबत राज्यपालही चाचपणी करत आहेत. एवढेच नाहीतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close