मनसेचं इंजिन फॉर्मात, सेनेशी जोडणार का ?

September 26, 2014 9:04 PM2 commentsViews: 12419

raj thackeray and uddhav thackeray

26 सप्टेंबर : महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे मनसेचं इंजिन फॉर्मात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपल्या नेत्यांसोबत
खलबतं सुरू आहे. एवढंच नाहीतर मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रियाही काही काळ रोखण्यात आली होती. पण शिवसेनेने स्पष्ट केलंय की शिवसेना एकटीने लढणार आहे.

गेल्या 25 वर्षांचा युतीचा संसार अखेर मोडलाय. भाजपने घटकपक्षांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे शिवसेना एकटी पडलीये. शिवसेना आणि मनसे यांचं नातं राजकीय जरी असलं तरी ठाकरे या नावाशी जोडलेलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांना टाळी देतील अशी चर्चा दबक्या आवाज सुरू आहे. आज सकाळपासूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रियाही काही काळ रोखण्यात आली होती. पण शिवसेनेने स्पष्ट केलंय की शिवसेना एकटीने लढणार आहे. सेनेच्या जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी यावर खुलासा केलाय. काही प्रसारमाध्यमं शिवसेना-मनसे युती होणार अशा आशयाच्या बातम्या पसरवून जनतेत गैरसमज पसरवत आहेत. शिवसेना ही विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकटी लढणार आहे.

परंतु सत्तेच्या सारीपाटावर कधी काय होऊ शकतं याचा नेम नाही. या अगोदर ही शिवसेनेसोबत येण्यासाठी उद्धव यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र राज यांनी टाळी देण्याऐवजी टोला लगावला होता. लोकसभा निवडणडणुकीतही पुन्हा एकदा अशीच चर्चा सुरू झाली होती. पण मोदीलाट आणि भक्कम महायुतीमुळे उद्धव यांनी हा विषय संपला असं जाहीर केलं होतं. त्यानंतर मात्र ‘टाळी’ ची शक्यता नाहीमध्येच जमा झाली होती. पण आता विधानसभेसाठी स्वबळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना एकटी मैदानात उतरणार आहे. तर लोकसभेत सुपडा साफ झाल्यानंतर मनसे सावध पवित्रा घेत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे टाळीचा निर्णय घेऊन राजकारणाला दिशा देतात की एकला चलो रे असा नारा देता हे पाहण्याचं ठरेल.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • तुषार ठाकरे

  प्रतेक मराठी माणसांची इच्‍छा कसली लाट आता लागणार bjp ची वाट

 • vidyanand

  मित्र हो,

  युती जागा वाटपा मुळे तुटली
  अस जरी वाटत असल तरी युती ठेवायची नाही हे अगोदरच फिक्स होत, त्याची खालील कारणे
  आहेत

  १ मोदी हे हुशार आणी
  महतवाकांशी नेते आहेत

  २ देशाच भल ते करतील या बाबत
  शंका नाही

  ३ मी ५ वर्ष गुजरात मधे राहत
  होतो २००४ ते २०१० याकाळात मी मोदीची खूप भाषण एकलित

  ४ गुजरात बद्दल त्याना फार
  अभिमान आहे ,ते शहाजिक आहे

  ५ पण ज्या ज्या वेळी गुजरात
  बद्दलचा त्यांचा अभिमान पुढे आला त्यावेळेस त्यानी महाराष्ट्र आम्हाला काही दिले
  नवह्ते याची आठवण ते करून देतात

  ६ गुजरात हा महाराष्ट्रा पेक्षा
  मोठा व्हावा , मुंबई गुजरातची असावी किंवा मुंबई अहमदाबाद ला शिफ्ट करावी ( म्हणजे
  बिज़्नेस) या करिता त्यानी खूप प्रयत्न केले

  ७ आज महाराष्ट्रात बीजेपी ची
  एक हाती सत्ता यावी आणि महाराष्ट्र किंवा मुंबई आपल्या ताब्यात यावी ही त्यांची
  ईछा आहे

  ८ महाराष्ट्राच वर्चस्व हे
  खूप लोकाना खुपते त्या पैकी मोदी एक आहेत

  ९ महाराष्ट्राचे तुकडे
  करायचे आणि महाराष्ट्राचा आवाज कमी करायचा असे खूप लोकांचे स्वप्ना आहे

  १० विदर्भ वेगळा कुणाला हवा
  आणि कशासाठी हे मला मी विदर्भचा असून पण कळले नाही

  ११ मत कुणाला पण द्या पण बीजेपी
  ला एक हाती सत्ता देणे हे कदाचित महाराष्ट्राच्या भल्याचे नाही

close