अश्विन नाईकने घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

May 23, 2009 5:51 PM0 commentsViews: 6

23 मेकुख्यात गुंड अश्विन नाईकने आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. तीन दिवसांपूर्वी नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. अश्विन नाईक यांनी राज आणि उद्धव यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. यासंदर्भात, उद्धव ठाकरे यांनी ती औपचारिक भेट असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत या भेटीच्या वेळी उपस्थित होते.

close