भाजपची यादी : चव्हाणांच्या विरोधात भोसले ; गावित, कदमांनाही तिकीट

September 26, 2014 11:28 PM0 commentsViews: 8734

ram kadam and gavit 26 सप्टेंबर : शिवसेनेशी घटस्फोट घेतल्यानंतर भाजपने आपली पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान सर्व आमदारांनी तिकीट देण्यात आलं आहे.

त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. तर दक्षिण कराडमधून काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या विरोधात अतुल भोसले यांना रिंगणात उतरवण्यात आलंय.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबारमधून, श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते, मनसेला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या राम कदम यांना घाटकोपरमधून आणि मंदा म्हात्रे अशा नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मंदा म्हात्रे यांना बेलापुरातून तर पनवेलमधून प्रशांत ठाकूरांना उमेदवारी मिळाली आहे. सिंदखेड्यात जयकुमार रावल, धुळ्यातून अनिल गोटे, गुहागरमधून विनय नातू यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 • नंदुरबार – डॉ.विजयकुमार गावित
 • धुळे – अनिल गोटे
 • भुसावळ – संजय सावकारे
 • मुक्ताईनगर – एकनाथ खडसे
 • अमरावती – डॉ.सुनील देशमुख
 • भोकर – डॉ.माधव किन्हाळकर
 • नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
 • बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
 • बेलापूर – मंदा म्हात्रे
 • दहिसर – मनीषा चौधरी
 • घाटकोपर पश्चिम – राम कदम
 • मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
 • चिंचवड – लक्ष्मण जगताप
 • श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
 • कराड दक्षिण – अतुल भोसले
 • गुहागर – विनय नातू
 • कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
 • तासगाव – अजित घोरपडे
 • सातारा – दीपक पवार
 • सिंदखेडा – जयकुमार रावल
 • मलकापूर – चैनसुख संचेती
 • तिवसा – निवेदिता चौधरी
 • राजुरा – संजय धोटे
 • रावेर – हरिभाऊ जावळे
 • चिमूर – कीर्तिकुमार भांगडिया
 • गंगापूर – प्रशांत बंब
 • नांदगाव – अद्वय हिरे
 • नाशिक मध्य – देवयानी फरांदे
 • विक्रमगड – विष्णू सावरा
 • बोरिवली – विनोद तावडे
 • कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
 • विलेपार्ले – पराग अळवणी
 • पनवेल – प्रशांत ठाकूर
 • कणकवली – प्रमोद जठार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close