मोदींचं मिशन अमेरिका, आज बोलणार युएनच्या सभेत !

September 27, 2014 12:52 PM0 commentsViews: 1395

modi in usa27 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर आगमन झालं. भारताचे अमेरिकेतले राजदूत जयशंकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर मोदी पॅलेस हॉटेलवर पोहोचले. त्यावेळी हॉटेलबाहेर अनिवासी भारतीयांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

‘मोदी…मोदी…न्यूयॉर्कस् लव्ह मोदी’ अशा घोषणा देत त्यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींनीही सुरक्षा व्यवस्था बाजुला सारत आपल्या चाहत्यांशी हस्तांदोलन केलं. मोदींच्या या भरगच्च दौर्‍यात 35 कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, महत्त्वाचे उद्योगपती आणि तिथल्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

त्याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळच्या राष्ट्रप्रमुखांशीही ते चर्चा करणार आहेत. न्यूयॉर्कमधल्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये त्यांचं भाषण होणार आहे. या भाषणाची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. आज त्यांचं संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भाषण होणार आहे. या भाषणात ते काश्मीर आणि पाकिस्तानवर काय पवित्रा घेतात, याबद्दल उत्सुकता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close