माधव कुमार यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवड

May 23, 2009 5:59 PM0 commentsViews: 1

23 मेकम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे नेते माधव कुमार नेपाळ यांची आज नेपाळच्या पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झालीय. नेपाळमधल्या 25पैकी 23 पक्षांनी नेपाळ यांना पाठिंबा दिलाय. नेपाळी लष्करप्रमुखांच्या बरखास्तीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान आणि अध्यक्ष राम बरन यादव यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे, अखेर 4 मेला नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल अर्थात प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर माओवाद्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर निषेध आणि निदर्शनांना सुरुवात केली होती. तेव्हापासून नेपाळमध्ये हिसाचार सुरू आहे. आज सकाळी काठमांडूमध्ये झालेल्या एका स्फोटात एक जण ठार, तर 10 जण जखमी झालेत.

close