काँग्रेसची तिसरी यादी : नितेश राणे, राहुल ठाकरेंना उमेदवारी जाहीर

September 27, 2014 2:58 PM0 commentsViews: 5558

nitesh rane kankavali27 सप्टेंबर : आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे सर्वच पक्षांनी याद्या जाहीर करण्याचा सपाटा लावलाय. काँग्रेसने आज आपली 30 उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर झाली केली आहे. तिसर्‍या यादीत उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव नितेश राणे यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यांच्याबरोबरच राहुल ठाकरेंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 30 जागांच्या या यादीमध्ये धुळेइथून कुणाल पाटील, काटोलमधून दिनेश ठाकरे, कणकवलीमधून नितेश राणे, यवतमाळमधून राहुल ठाकरे आणि किनवटमधून आकाश जाधव यांच्या जागी नामदेव केशवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसर्‍या यादीत नितेश राणे आणि राहुल ठाकरे यांचं नाव नव्हतं त्यानंतर तिसर्‍या यादीत दोघांचीही नाव जाहीर करण्यात आलीये. नितेश राणे आजच आपला अर्ज भरणार आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत कुडाळमधून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता नितेश राणेंनी कणकवलीतून उमेदवारी जाहीर झाली मात्र नितेश राणे यांना मात्र विधानसभेला मुकावे लागले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close