‘मिस्टर’ नाही ‘होममिनिस्टर’ रिंगणात !

September 27, 2014 5:26 PM0 commentsViews: 972

ameeta chavan27 सप्टेंबर : अखेर काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण उमेदवारी अर्ज भरणार नाही हे स्पष्ट झालंय मात्र अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय.

अमिता चव्हाण यांना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. आज अचानकर अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती.

विशेष म्हणजे विशेष म्हणजे तीनच दिवसांपुर्वी अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी भोकरमधूनच स्वत:ची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र अचानक अशोक चव्हाण यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात सापडले होते.

एवढंच नाही तर काँग्रेसने तीन याद्या जाहीर केल्या आहेत पण तिसर्‍या यादीतही भोकर मतदारसंघाची उमेदवारी वेटिंगवर ठेवली होती अखेरीस काँग्रेस वरिष्ठांनी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close