15व्या लोकसभेचं अधिवेशन एक जूनपासून सुरू

May 23, 2009 6:13 PM0 commentsViews: 4

23 मेपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल 19 मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आजपासून कामकाजाला सुरूवात केली. नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज झाली. पंधराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन एक जूनपासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर लोकसभा अध्यक्षांची निवड तीन जूनला केली जाणार आहे. तसंच 31 जुलैपूर्वी बजेट सादर केलं जाणार असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी दिली.

close