शिवशक्ती-भीमशक्ती संपुष्टात, रिपाइंही भाजपसोबत !

September 27, 2014 7:22 PM2 commentsViews: 3055

ramdas athwale in bjp27 सप्टेंबर : गेल्या 25 वर्षांचा शिवसेना आणि भाजपचा संसार मोडला असताना आता शिवशक्ती आणि भीमशक्तीही संपुष्टात आली आहे. राज्यात चार मंत्रीपद, 3 विधान परिषद आमदारपदं, आणि महामडळांवर अध्यक्ष आणि सत्तेत आल्यावर 10 टक्के हिस्सा या समझौत्यावर अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपण भाजपसोबत जात असल्याचं जाहीर केलं.

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर घटकपक्षांनी भाजपशी घरोबा केला. मात्र रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. दोन दिवस चर्चा आणि बैठकानंतर आज भाजपसोबत जाण्याचा निर्णय आठवलेंनी जाहीर केला. रिपाइंला भाजपसोबत घेण्यासाठी भाजपने आठवलेंवर आश्वासनांची खैरात केली आहे. सत्ता आल्यास सत्तेत 10 टक्के हिस्सा देण्याचं आरपीआयला आश्वासन देण्यात आलंय. या आश्वासनांनंतर आरपीआय भाजपसोबतच असल्याचं आरपीआय अध्यक्ष रामदास पाठवले यांनी सांगितलं. त्यामुळे आता चौथा पक्षही भाजपसोबत गेला आहे. आरपीआयला राज्यात चार मंत्रीपद , 3 विधान परिषद आमदारपदं, आणि महामडळांवर अध्यक्ष बनवण्याचं आश्वासन दिलंय. देशातल्या तीन समित्यांवर सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रीपदं देण्यात आलंय.

आरपीआयला दिलेल्या आठ जागा

- चेंबूर- दीपक निकाळजे
- अंधेरी इस्ट- प्रदीप शर्मा
- विक्रोळी- विवेक पंडित
- पिंपरी- चंद्रकांत सोनकांबळे
- पुणे- नवनाथ कांबळे
- मुंब्रा- कुंदन गोटे
- भांडूप- अनिल गांगुर्डे
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • सागर गाटे

    लाचार माणूस आहे हा आठवले….जिकडे मिळेल तिकडे पळतो

  • pawan

    org rajkaryakata ahe athwle saheb…mag udya koni kadhay???

close